जिल्ह्याला चार मंत्री असूनही न्याय मिळत नसल्याचे दिसतेय अशी टीका शिवाजी कर्डिले यांनी केली
पाथर्डी | Pathardi: पाथर्डी तालुक्यातून बिबट्याच्या तीन घटना समोर आल्या असून तेथे एकही मंत्री भेट देण्यास गेलेले नाही. एक मंत्री गेले होते. मात्र तेही आपल्या मतदार संघातील शिरापूर गावातच भेट दिली. तसेच मागे निघून आले. यामधून असे दिसून आले की, जिल्ह्यात चार मंत्री असताना देखील जिल्ह्याला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नसल्याचे दिसून येत आहे अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली आहे.
नगरमध्ये मंगळवारी एका कार्यक्रमात त्यांनी ही टीका केली. त्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता शिवाजी कर्डिले यांनी टीका केली आहे.
पाथर्डी तालुक्यात मढी, केळवंडी व शिरापूर या गावांत बिबट्याने हल्ला करीत तीन मुलांना बिबट्याने उचलून नेले आहे. तीन बालकांवर बिबट्याने हल्ला करीत ठार केले आहे. मात्र या बिबट्याला पकडण्यात यश आले नाही. मढी येथील प्रकार घडल्यानंतर लक्ष दिले असते तर पुढील अनर्थ टाळता आले असते असेही त्यांनी म्हंटले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar Despite having four ministers Shivaji Kardile