तलवारीसोबत फोटो काढून स्टेटस ठेवला; पोलिसांनी काही तासांतच आरोपीला ठोकल्या बेड्या- Ahmednagar Crime
Ahmednagar Crime: हातात तलवार घेतलेला फोटो व्हॉटसअॅप स्टेटसवर शेयर (Viral) केला असता पोलिसांनी आरोपीला तातडीनं अटक (Arrested)केली आहे.
अहमदनगर: तलवार, बंदुका किंवा धारदार शस्त्र हातात घेतलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा ट्रेंड सध्या गुन्हेगारांमध्ये चांगलाच फोफावत चालला आहे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर महिंद्रा थारच्या टपावर बसून एका तरुणानं रायफलीतून गोळीबार केल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता ही घटना ताजी असतानाच अहमदनगरमध्ये एका तरुणानं हातात तलवार घेतलेला फोटो व्हॉटसअॅपवर शेयर केल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलिसांनी तातडीने आरोपी तरुणाला काही तासांच्या आत तलवारीसह अटक (Arrested) केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अहमदनगर शहरातील सर्जेपुरा परिसरातील मतीन सय्यद समशोद्दीन या तरुणानं तलवारीसोबत फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर तलवार हातात असलेल्या मतीनचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. अनेक तरुणांनी मतीनच्या फोटोंवर आक्षेप घेत त्यावर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर शहरातील तोफखाना पोलिसांनी तातडीनं प्रकरणाची चौकशी करत मतीनला काही तासांच्या आत तलवारीसह अटक केली आहे. त्यानंतर आरोपी मतीनची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.
Web Title: Ahmednagar Crime picture with Talwari and posted the status; The police handcuffed the arrested within a few hours
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App
Good Ahmednagar news