Home अहिल्यानगर Ahmednagar: जिल्ह्यात आज ६४४ रुग्ण बरे तर इतक्या रुग्णांची वाढ

Ahmednagar: जिल्ह्यात आज ६४४ रुग्ण बरे तर इतक्या रुग्णांची वाढ

Ahmednagar corona update today 24 Sep

अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात आज ६४४ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ३४ हजार ७६९ झाली आहे. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ते ८८.७७ टक्के इतके आहे.

आज बरे झालेले रुग्ण यामध्ये मनपा १४४, संगमनेर २०, राहता ४४, पाथर्डी ११, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर ४१, कॅन्टोनमेंट १७, नेवासा २३, श्रीगोंदा ३५, पारनेर ३७, अकोले ९८, राहुरी ३४, शेवगाव ४२, कोपरगाव ३२, जामखेड ३४, कर्जत ६, मिलिटरी हॉस्पिटल १० अशा रुग्णांचा समावेश आहे.

तसेच काल सायंकाळी सहा वाजेपासून ते आज १२ वाजेपर्यंत ८४ रुग्णांची वाढ झाली आहे. सध्या ३७५० इतक्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज बाधित बाधित आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ५८, राहता १, श्रीरामपूर ४, नेवासा २, श्रीगोंदा ५, पारनेर २, अकोले ३, राहुरी ३, कोपरगाव ३, जामखेड २, इतर जिल्हा १ अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ३९ हजार १६६ इतकी झाली आहे.  

See:  Latest Entertainment NewsLatest Marathi News, and Latest Marathi News Live

Web Title: Ahmednagar corona update today 24 Sep. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here