अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या घटली: गुरुवारी ३१६ रुग्ण
अहमदनगर | Ahmednagar: जिल्ह्यात मागील तीन महिन्यात इतके कमी रुग्ण संख्या आढळून आली आहे. नगर शहरात देखील संख्या कमी झाली आहे. गुरुवारी ३१६ करोनाचे रुग्ण आढळून आले. रुग्ण कमी आणि बरे होणाऱ्याची संख्या आशिक असल्याने सध्या २ हजार ६५२ रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत ४१, खासगी प्रयोगशाळेत ९१, अॅटीजेन चाचणीत १८४ रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
यामध्ये अहमदनगर शहर ४५, कर्जत ११, नगर ग्रामीण २५, पारनेर १४, पाथर्डी ४६, राहता २५, राहुरी १०, संगमनेर १९, शेवगाव १३, श्रीगोंदा १६, श्रीरामपूर ११, अकोले २१, जामखेड १८, नेवासा १९ येथील रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ४८ हजार ६८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ९३.३९ टक्के इतके झाले आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Latest Ahmednagar News in Marathi, and Latest Marathi News
Web Title: Ahmednagar Corona Patient Decreases