महावितरणच्या कंत्राटी कामगाराचा काम करताना विजेच्या धक्क्याने मृत्यू
अहमदनगर | Ahmednagar: नगर तालुक्यातील खडकी येथील महावितरणच्या कंत्राटी कामगार खांबावर चढला आणि विजेच्या धक्याने त्याचा मृत्यू झाला. या कामगाराच्या कुटुंबाला ५० लाखाची मदत मिळावी यासाठी ग्रामस्थांनी मृतदेह थेट महावितरण कार्यालयात आणला. सायंकाळपर्यंत यावर काही तोडगा निघालेला नाही.
रुपेश सुखदेव बहिरट वय २६ रा. खडकी असे मयत कामगाराचे नाव आहे. रुपेश हे महावितरणकडे कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होते. गुरुवारी सकाळी ते बाबुर्डी बेंद येथे कामानिमित्त वरिष्ठ समवेत कामास आले होते. वरिष्ठ यांच्या सांगण्यावरून एका वीज खांबावर चढले. त्याचदरम्यान वीज प्रवाह उतरून विजेच्या धक्याने बहिरट यांचा मृत्यू झाला. या घटनेला पूर्णपणे महावितरणचे वरिष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे आरोप करीत ग्रामस्थांनी त्यांचा मृतदेह थेट महावितरण कार्यालयात आणला.
जोपर्यंत महावितरण कर्मचारी कुटुंबाला ५० लाखांची मदत देणार नाही तोपर्यंत मृतदेह कार्यालयातून हलणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. यावर महावितरणचे अधिकारी नियमानुसार जी विम्याची रक्कम असेल ती देऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
Web Title: Ahmednagar contract worker dies of electric shock