Home अहिल्यानगर महिलेवर अत्याचार प्रकरण: त्या माजी सभापती नेत्याच्या अडचणीत वाढ

महिलेवर अत्याचार प्रकरण: त्या माजी सभापती नेत्याच्या अडचणीत वाढ

Ahmednagar Case of atrocities against women Increase in the difficulty 

Ahmednagar News Live | अहमदनगर: नगर येथील एका उपनगरातील एका महिलेवर अत्याचार (sexually abuse) केल्याप्रकरणी फरार असलेला पंचायत समितीचा माजी सभापती गोविंद मोकाटे याचा अटकपुर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने मोकाटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोविंद मोकाटे यांच्यावर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मोकाटे याच्या वतीने जिल्हा सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन ठेवण्यात आला होता.

शुक्रवारी (दि.७ जानेवारी) सदर जामीन अर्जावर सुनावणी होऊन अर्ज फेटाळण्यात आला असल्याची माहिती सरकारी वकील दिवाने यांनी दिली. सदर अर्ज फेटाळून लावल्याने मोकटे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. या अर्जावर जिल्हा न्यायाधीश अमित शेटे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली.

आरोपी मोकाटे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास अहमदनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. मोकाटे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असून त्याला अटक करण्याची मागणी पिडीत महिलेकडून होत आहे.

Web Title: Ahmednagar Case of atrocities against women Increase in the difficulty 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here