नगरमध्ये तीन कोटी 25 लाख रुपयांचे रक्तचंदन जप्त, बटाट्याच्या गोण्यांखाली होता
अहमदनगर|Ahmedagar: एमआयडीसी पोलिसांची कारवाई, शुक्रवारी रात्री सहा ते सात टन रक्तचंदन जप्त (seized) करण्यात आले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे तीन कोटी 25 लाख रूपये किंमत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.
दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा’ चित्रपटामुळे रक्तचंदन सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात रक्तचंदनाची तस्करी दाखवण्यात आली असून कशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची विक्री केली जाते याबद्दल भाष्य करण्यात आलं आहे.
दरम्यान एमआयडीसी हद्दीत सदाशिव झावरे यांच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररित्या चोरून आणलेले रक्तचंदन ठेवलेले आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक आठरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकासह नमुद ठिकाणी दोन पंचासह छापा टाकुन खात्री केली असता, गोडाऊनमध्ये बटाट्याच्या गोण्याखाली लपवून ठेवलेले सहा ते सात टन रक्तचंदन मिळून आले आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात अंदाजे तीन कोटी 25 लाख रुपये किंमत आहे. पोलिसांनी सर्व रक्तचंदन जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.
Web Title: Ahmednagar Blood sandalwood worth Rs 3 crore 25 lakh seized in town