अहमदनगर महापालिका स्थायी समिती निवडणूक: ऐनवेळी भाजपचा नगरसेवक राष्ट्रवादीत
भाजपचे नगरसेवक मनोज खोतकर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपाला ऐनवेळी मोठा धक्का
अहमदनगर | Ahmednagar: भाजपचे स्थायी समिती सभापती पदासाठी इच्छुक उमेदवार नगरसेवक मनोज खोतकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भाजपचे नगरसेवक ऐनवेळी राष्ट्रवादीत गेल्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती पदासाठी उद्या एक वाजता निवडणूक होणार आहे.
नगरसेवक मनोज कोतकर हे भाजपकडून सभापती पदासाठी इच्छुक होते. भाजपानेही त्यांच्या मागे ताकद लावली होती. त्यांना निवडून आणण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मोर्चेबांधणी सुरु केली होती. मात्र अचानक ऐनवेळी मनोज कोतकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणे अचानक बदलली आहेत. उद्या दुपारी एक वाजता निवडणूक. होत असल्याने भाजपाची अचानक मोठी पंचायत झाली आहे.
See: Latest Entertainment News, Latest Marathi News, and Latest Marathi News Live
Web Title: Ahmednagar BJP corporator was in NCP