Home अहमदनगर बिलाच्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरने केली लोखंडी नळीने मारहाण

बिलाच्या वादातून रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरने केली लोखंडी नळीने मारहाण

Ahmednagar beaten by a doctor with an iron bar due to a dispute

Ahmednagar: नगरमध्ये एका कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाच्या नातेवाइकांना डॉक्टरने लोखंडी नळीने मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  रुग्णाच्या आजूबाजूला असलेल्या मृतदेहांचे चित्रीकरण केले आणि पक्के बिल मागितल्याच्या कारणातून डॉक्टरांनी नातेवैकाना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

तसेच डॉक्टरने देखील नगरच्या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून नातेवाईकविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

नगर शहरातील स्वस्तिक चौकातील पॅसिफिक केअर सेंटर या खासगी कोविड रुग्णालयात ही घटना घडली. जामखेड येथील आकाश भागवत डोके यांनी ही फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार, त्यांचे मेहुणे भागवत सुपेकर यांना करोनाची लागण झाल्यामुळे ५ मे रोजी नगरच्या या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचे नातेवाईक आकाश डोके आणि संजीव जाधव त्यांना भेटण्यासाठी ८ मे रोजी गेले असता सुपेकर हे खूप घाबरलेले होते. त्यांच्या आजूबाजूला काही मृतदेह अनेक तासांपासून पडून होते. ते हलवण्याची विनंती कोविड सेंटरच्या कर्मचाऱ्यांना केली असता त्यांनी कुठलीही दखल घेतली नाही. म्हणून आकाश डोके यांनी तेथील प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला.

१० मे रोजी नातेवाईक सुपेकर यांचा मृत्यू झाल्याचे डोके यांना कळविण्यात आले. त्यानुसार डोके व त्यांचे मामा संजय किसन जाधव जामखेडहून रुग्णवाहिका घेऊन मृतदेह आणण्यासाठी नगरला आले. तेथे डॉ. प्रशांत जाधव यांनी आधी बिल भरा, नंतर मृतदेह ताब्यात मिळेल, असे सांगितले. बिलाची विचारणा केली असता २ लाख ६५ हजार रुपये बिल झाल्याचे सांगण्यात आले व त्याचे कच्चे बिल दिले. त्यावर डोके यांनी पक्के बिल द्या, अशी मागणी केली. असता तेथील कर्मचाऱ्यांना राग आला. तेथे उपस्थित कलाराज पाटील, बाळकृष्ण पाटील यांनी डोके यांना लाथाबुक्यांनी मारहाण करत रुग्णालयाच्या बाहेर नेले. थोड्या वेळात तेथे यश पोळ, बळराम पाटील आले. त्यांनी डोके व त्यांचे मामा जाधव यांना मारहाण करीत रुग्णालयाच्या बिलिंग रूममध्ये नेले. नंतर तेथे डॉ. प्रशांत जाधव तिथे आले. त्यांच्या हातात लोखंडी गज होता. त्यांनी त्या गजाने मारहाण केली. तेव्हा डोके यांचे आणखी काही नातेवाईक धावून आले व त्यांनी त्या दोघांची सुटका केली. अशी फिर्याद डोके यांनी जामखेड पोलीस ठाण्यात दिली आहे.

Web Title: Ahmednagar beaten by a doctor with an iron bar due to a dispute

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here