Home अहिल्यानगर जखणगाव महिलेच्या जाळ्यात क्लासवन अधिकारी अडकला, अश्लील व्हिडियो करून मागितली ३ कोटींची...

जखणगाव महिलेच्या जाळ्यात क्लासवन अधिकारी अडकला, अश्लील व्हिडियो करून मागितली ३ कोटींची खंडणी

Ahmednagar Another one officer Honey Trap Case

अहमदनगर | Honey Trap Case: नगर तालुक्यातील जखणगाव येथील महिलेच्या जाळ्यात नगर शहरातील एक क्लास वन अधिकारी अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात सदर महिलेसह अन्य पाच आरोपी विरोधात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे. यामधील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

अधिकाऱ्याला घरी बोलावून शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडून अश्लील व्हिडियो तयार करून सदर महिला व तिच्या साथीदारांना अधिकार्याकडे ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यामधील ८० हजार रुपये त्याने तिला दिले होते. हे अनैतिक कृत्य करण्यात महिलेचा खास एजंट अमोल मोरे, सचिन खेसे रा. हिंगणगाव ता. नगर, सागर खरमाळे, महेश बागले, रा, नगर यांचा समावेश आहे. यातील सचिन  खेसे यास पोलिसांनी अटककेली आहे. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अशा पद्धतीने अनेक जणांना खंडणी मागितल्याची चर्चा असल्याने पोलीस कसून चौकशी करत आहे. सदर अधिकारी हा जखणगावाच्या शेजारील गावातील रहिवासी आहे. या महिलेबाबत पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर या अधिकाऱ्याने पोलिसांशी संपर्क करून सर्व व्यथा मांडली. याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक राजेंद्र सानप अधिक तपास करीत आहे.

Web Title: Ahmednagar Another one officer Honey Trap Case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here