अहमदनगर: टेम्पोखाली चिरडून दोन बालकांचा मृत्यू
Ahmednagar News: दोन बालकांचा टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून (Accident) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
शेवगाव | Shevgaon: शेवगाव शहरातील तळणी रस्त्यावरील एका जिनिंगमधील शेडमध्ये झोपलेल्या दोन बालकांचा टेम्पोच्या मागील चाकाखाली चिरडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोमवारी (दि.17) सकाळी साडे सहाच्या दरम्यान हि घटना घडली. तर एक 6 वर्षीय बालिका दुर पळाल्याने ती बचावली आहे.
सचिन लालसिंग मेवाड (वय 3), कार्तिक लालसिंग मेवाड (वय 2 दोघे रा. ताराबापडी ता. भगवानपुरा जि. खरगोण, मध्यप्रदेश) अशी या घटनेत मृत्यू झालेल्या बालकांची नावे आहेत. तर मुस्कान लालसिंग मेवाड (वय 6) ही मुलगी बाजूला पळाल्याने बचावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अवकाळी पाऊस येण्याचा अंदाज आल्याने सरकी पेंड पोती भरलेला टेम्पो क्रमांक (एमएच 16 सी डी 9747) च्या चालकाने या जिनिंगच्या शेडमध्ये लावून ठेवला होता. याच शेडमध्ये मध्यप्रदेशातून जिनींगमध्ये मजूरी कामासाठी आलेल्या लालसिंग मेवाड आपल्या तीन्ही लहान मुलांसह झोपले होते. दरम्यान सकाळी मेवाड हे आपल्या तीन्ही मुलांना तेथेच झोपवून कामासाठी बाहेर गेले होते.
सकाळी साडे सहाच्या सुमाराला टेम्पो घेऊन जाण्यासाठी चालक तेथे आला. त्याने टेम्पो सुरु करुन वळुन घेण्यासाठी पाठीमागे घेतला. टेम्पो मागे घेत असतांना तो सरळ झोपलेल्या दोन मुलाच्या अंगावर गेल्याने ती जागेवर चिरडली जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर तीसरी मुलगी त्यांच्या आवाजाने भेदरून बाजूला पळाली त्यामुळे ती बचावली.
यावेळी जिनिंगवर काम करणार्या कामगारांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मुलांची अवस्था पाहून त्यांच्या आईवडिलांनी दुःखाच्या अकांताने टाहो फोडला हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा होता. कामगारांनी टेम्पो चालकास तेथील कार्यालयात कोंडून ठेवले. या घटनेची माहिती शेवगाव पोलिसांना समजल्यावर त्यांनीही घटनास्थळी धाव घेत टेम्पो व चालकास ताब्यात घेतले. घटनास्थळाचा पंचनामा करुन दोन्ही बालकांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. शेवगाव पोलीस ठाण्यात टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Accident Two children died after being crushed under a tempo
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App