Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात करोनाचे २४ तासांत २४ मृत्यू

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात करोनाचे २४ तासांत २४ मृत्यू

Ahmednagar 24 hours 24 corona death 

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर  जिल्ह्यात बुधवारी सायंकाळ ते गुरुवार सायंकाळ या २४ तासांत तब्बल २४ मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधित मृत्यूची संख्या ३३० इतकी झाली आहे. सध्या ३,०४५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. १९,९६१ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. जिल्ह्यात एकूण करोनाबाधितांची संख्या २३,३३६ इतकी झाली आहे.

करोनाबाधितांची संख्या वाढत असताना बाधित मृत्यूची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. जिल्ह्यात गुरुवारी ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना प्रयोगशाळेत ६६ रुग्ण, अॅटीजेन चाचणीत ३१५ रुग्ण, खासगी प्रयोगशाळेत २५१ जणांचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये नगर शहर २१०, भिंगार व नगर ग्रामीण ६२, राहुरी १८, शेवगाव ११, कोपरगाव २३, जामखेड २९, राहता ६४, पाथर्डी ५३, श्रीरामपूर ३४, नेवासा ४८, श्रीगोंदा ८,म पारनेर १९, अकोले २१, कर्जत ११, संगमनेर १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: Ahmednagar 24 hours 24 corona death 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here