अहमदनगर जिल्ह्यात १३३ रुग्णांना सोडण्यात आले घरी
अहमदनगर(Ahmednagar): अहमदनगर जिल्ह्यात आज १३३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. आज तब्बल १३३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे जिल्ह्यातील करोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४१८ इतकी झाली आहे.
आज मनपा(३४), संगमनेर(६), राहता(८), पाथर्डी(१), नगर ग्रामीण (२७), श्रीरामपूर(२), कॅन्टोनटमेंट(२६), नेवासा(३), श्रीगोंदा(९), पारनेर (२), अकोले(८), राहुरी(५), शेवगाव(१), कर्जत(१) या रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे झालेल्यांची संख्या ही वाढत असल्याने दिलासा मिळत आहे. जितके रुग्ण वाढत आहेत तेवढेच रुग्ण बरे होताना दिसत आहे.
वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.
Website Title: Ahmednagar 133 patient corona free