Home नगर अहिल्यानगर गारठले! नीचांकी तापमान, इतके खाली आले तापमान

अहिल्यानगर गारठले! नीचांकी तापमान, इतके खाली आले तापमान

Weather Update: राज्यात नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात.

Ahilyanagar lowest temperature, the temperature dropped so low, Weather Update

अहिल्यानगर – उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरू आहे, त्यामुळे तिकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात हुडहुडी भरली आहे. तापमानात कमालीची घट झाली असून, राज्यात नीचांकी ५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद अहिल्यानगर जिल्ह्यात झाली. राज्यात सर्वाधिक तापमान १९.८ मुंबईत नोंदवले गेले. गुरुवारपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. तापमानात सातत्याने चढउतार होत आहे. पहाटे थंडीचे प्रमाण जास्त असल्याने मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली आहे. कडाक्याची थंडी आणि दिवसभर गारव्यामुळे आल्हाददायक वातावरण नागरिक अनुभवत आहेत.

अनेकांना गारवा आणि हवा प्रदूषणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. स्वेटर, जॅकेट, शॉल, मफलर परिधान करून नागरिक थंडीपासून बचाव करत आहेत. आकाश दिवसभर निरभ्र आणि सकाळी काही भागात धुके असेल. शुक्रवारनंतर तापमानात वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

Web Title: Ahilyanagar lowest temperature, the temperature dropped so low, Weather Update

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here