कुंटणखान्यावर कारवाई; मॅनेजरसह दोघांना अटक तर नऊ महिलांची सुटका
Breaking News | Mumbai Crime: महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कुंटणखान्याच्या मॅनेजरसह दोघांना पोलिसांनी अटक.
मुंबई: ग्रँटरोड येथील एका कुंटणखान्यात गुन्हे शाखेच्या अंमलबजावणी विभागाने कारवाई करून नऊ महिलांची सुटका केली. या महिलांना जबदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी कुंटणखान्याच्या मॅनेजरसह दोघांना पोलिसांनी अटक केली. रविंद्रकमार जादू जाधव अणि चंद्रशेखर गवी गौडा अशी या दोघांची नावे असून त्यांना पुढील चौकशीसाठी डी.बी मार्ग पोलिसांकडे सोपविण्यात आले आहे.
ग्रँटरोड येथे सुरू असलेल्या या कुंटणखान्याविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गेल्या काही वर्षांत स्थानिक पोलिसांसह अंमलबजावणी विभागाने काही कुंटणखान्यात छापा टाकून तिथे चालणार्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला होता. या गुन्ह्यांत काही आरोपींना अटक करुन त्यांच्या तावडीतून अनेक महिलांची सुटका केली होती.
मात्र, ही कारवाई सुरू असताना अद्याप काही महिलांना कुंटणखान्यात डांबून ठेवून त्यांना जबदस्तीने वेश्याव्यवयसायास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती अंमलबजावणी विभागाला मिळाली होती. या माहितीनंतर या पथकाने ग्रँटरोड येथील लॅमिंग्टन रोड, शामराव विठ्ठल मार्गावरील रेळे दिनेश इमारतीच्या तळमजल्यावरील एका फ्लॅटमध्ये छापा टाकून रवींद्रकुमार आणि चंद्रशेखर या दोघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी नऊ महिलांची सुटका केली. त्यांच्या चौकशीतून तिथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या दोघांनाही भारतीय न्याय संहिता आणि पिटा कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली होती.
Web Title: Action on Kuntankhana, Two people including the manager were arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study