‘एसीपी’ चे महिलेशी कारमध्ये अश्लील चाळे, विनयभंगाचा गुन्हा दाखल
Aurangaabad Crime: गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त यांनी दारूच्या नशेत धावत्या कारमध्ये महिलेशी अश्लील चाळे केल्याची घटना. विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल, तडकाफडकी बदली.
औरंगाबाद: औरंगाबाद शहर पोलिस दलातील गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त विशाल डुमे यांनी दारूच्या नशेत धावत्या कारमध्ये एका महिलेशी अश्लील चाळे केले. नंतर घरी गेल्यावर त्या महिलेच्याच बेडरूममधील वॉशरूम वापरण्यासाठी आग्रह करीत तिचा पती, दीर, सासूला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. हा प्रकार शनिवारी मध्यरात्रीनंतर 2.30 वाजेच्या सुमारास पडला. याप्रकरणी दुमेंच्या विरोधात विनयभंगासह घरात घुसल्याचा गुन्हा (Crime) नोंदविण्यात आला.
पीडिता पती, मुलीसह एका रेस्टॉरंटमध्ये रात्री जेवण्यासाठी गेली होती. तिथे हुमे हे मित्रासह आले होते. पीडितेच्या पतीची डुमेसोबत ओळख होती. डुमॅनी पतीला पोलिस आयुक्तालयासमोर सोडण्याची विनंती केली. पावणेदोन वाजता सर्व कारने निघाले. पीडिता पुढील सीटवर मुलीसह बसली होती. हुमे मागच्या सीटवर होते. त्यांनी मागून पीडितेसोबत अश्लील चाळे सुरू केले. नंतर ते पीडितेच्या घरी गेले. पीडितेच्या बेडरूममधील वॉशरूम वापरण्याचा आग्रह केला. दुर्मनी सासू आणि पतीला शिवीगाळ केली. पतीने पोलिसांना बोलवले. नागरिकही चावले. पोलिस डुमेना घेऊन गेले.
पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी एसीपी हुमे यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली केली. घटनेचा अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला. निलंबनाचा निर्णय गृह मंत्रालयस्तरावरच होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
Web Title: ACP filed a case of molestation with a woman in a car
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App