Murder: वेटरचा खून करणारा आरोपी अखेर जेरबंद
Parner Murder Case: पारनेर येथील घटना: वेटरचा खून करून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक (Arrested).
अहमदनगर: पारनेर येथील हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरचा खून करून पसार झालेल्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली. राजू औटी (रा. क्रांती कारखान्याजवळ देवीभोयरे, ता. पारनेर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पारनेर येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या मन्सूर अन्सारी (रा. उत्तरप्रदेश) याला ठार मारल्याची घटना फेब्रुवारी २०२२मध्ये घडली होती. याबाबत राजू राहुल लोळगे (रा. निघोज, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तेंव्हापासून आरोपी औटी हा फरार होता. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस करण्याचा आदेश स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना झाले होते. कामगाराचा खून राजू औटी याने केल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक कटके यांना मिळाली.
त्याआधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देवीभोयरे येथे सापळा लावला. पोलीस शोध घेत असल्याची माहिती मिळताच औटी हा पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांनी वेशांतर करून त्याला ताब्यात घेतले असून, त्याला पारनेर पोलीस ठाण्यात हजर केले. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे, पोलीस नाईक सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, संदीप पवार, संदीप घोडके, शंकर चौधरी, रवींद्र सोनटक्के आदींच्या पथकाने केली.
Web Title: accused who Murder the waiter was finally Arrested
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App