Home अहिल्यानगर अहिल्यानगर: पोलीस स्टेशनला कडी लावून आरोपी पळाला

अहिल्यानगर: पोलीस स्टेशनला कडी लावून आरोपी पळाला

Breaking News | Ahilyanagar Crime: मुलांना नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या आरोपीला खंडाळ्याजवळ इंजेक्शनसह पकडण्यात आले. व्यक्ती मध्यरात्री पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला.

accused ran away from the police station

श्रीरामपूर : जिममधील मुलांना नशेचे इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या आरोपीला खंडाळ्याजवळ इंजेक्शनसह पकडण्यात आले. त्याची शहर पोलिसांकडून चौकशी सुरू असताना हा व्यक्ती मध्यरात्री पोलिसांच्या हाताला झटका देवून पसार झाला आहे. तसेच जाताना पोलिस स्टेशनच्या दाराला कडी लावून पळाला. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी आरोपीस काल संध्याकाळी बेलापूर येथिल काटवनात जेरबंद केले.

आपला अॅप आजच येथून अपडेट करा: अहिल्यानगर न्यूज 

जावेद सिराज शेख (रा. लोणी, ता. राहाता) हा खंडाळा येथील श्रीरामपूर-बाभळेश्वर रस्त्यावरील बाबासाहेब काळे यांच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपासमोर नशेचे इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती श्रीरामपूर पोलिसांना मिळाली होती. परवाना नसताना अशा औषधांची बिलाशिवाय विक्री जिममधील तरूणांना तसेच इतर ग्राहकांना करण्यासाठी आणले आहेत. तेव्हा पोलिसांनी सोमवारी 24 फेब्रुवारी दुपारी दोनच्या सुमारास या ठिकाणी जाऊन सापळा लावून जावेद शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे परवाना नसलेल्या आणि शरीरास अपायकारक, गुंगीकारक औषधांचे इंजेक्शन आढळून आले. पोलिसांनी सुरुवातीला याठिकाणी डमी ग्राहक पाठवून शेख याच्याकडून सेवन करण्याकरीता इंजेक्शनची मागणी केल्यानंतर पोलिसांनी या आरोपीला पकडून शहर पोलिस ठाण्यात आणले. त्याच्याकडून 83 हजार 230 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रात्री दीड वाजेच्या सुमारास चौकशी सुरू असताना पोलिसांच्या हाताला झटका देवून हा जावेद शेख ठाण्यातून पळून गेला. जाताना त्याने ठाण्याच्या खोलीचा दरवाजाला बाहेरून कडी घातल्याची माहिती निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली. दरम्यान, पोलिसांनी या आरोपीला बेलापूर येथून काटवनात जेरबंद केले आहे.

Web Title: accused ran away from the police station

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here