Home अहमदनगर अल्पवयीन मुलीस शाळेतून अपहरण करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीस शाळेतून अपहरण करणाऱ्या आरोपीस सक्तमजुरी

Accused of abducting a minor girl from school

अहमदनगर | Ahmedagar:  एका अल्पवयीन मुलीचे अपहरण (abducting a minor girl) केल्याप्रकरणी प्रमोद मच्छिंद्र कदम (वय 41 रा. सुपा ता. पारनेर) याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि ९ हजार रुपयांचा दंड,  दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा विशेष जिल्हा न्यायाधीश एम. एच. मोरे यांनी ठोठावली आहे.

आठ वर्षीय मुलगी 13 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी शाळेतील पटांगणात खेळत होती. त्यावेळेस आरोपी प्रमोद कदम हा शाळेच्या प्रवेशद्वारावर आला. आणि पिडीत मुलीस बोलावू लागला. परंतु, मुलीने बाहेर येण्यास नकार दिला. त्यावर प्रमोद याने ‘चल तुला तुझ्या पप्पांनी बोलाविले आहे.’ असे म्हणून पीडित मुलगीस एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिच्या शरीराला वाईट हेतूने स्पर्श करू लागला. त्यामुळे पीडित मुलगी घाबरून मोठ्याने रडू लागली. सदर घटना ही रस्त्यावरून जाणार्‍या एका महिलने पाहिली असता तिने विद्यालयातील मुलांना मदतीसाठी बोलवून अल्पवयीन मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली.

मुलीने शाळेच्या शिक्षकांना आणि मुख्याध्यापिका यांना हा प्रकार सांगितला. मुख्याध्यापिका यांनी पीडित मुलीसह सुपा पोलीस ठाण्यात आरोपीविरूध्द फिर्याद दिली. सुपा पोलिसांनी अपहरण (kidnaped) करणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून (sexual abusing) संरक्षण कायदा 2013 (पोस्को) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. . याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत खोसे यांनी गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सहा साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी, शाळेच्या मुख्याध्यापिका तथा फिर्यादी, पंच साक्षीदार, तपासी अधिकारी, वैद्यकिय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुरावा तसेच विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस शिक्षा ठोठावली.

Web Title: Accused of abducting a minor girl from school

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here