गोड बोलून बर्थडे पार्टीला नेलं, अमली पदार्थ देत बेशुद्ध केलं अन्.., भयंकर कांड

    Breaking News | Palghar Crime: मुलगी आपल्या प्रियकरासोबत कॉमन मैत्रिणीच्या घरी बर्थडे पार्टीला गेली होती. पण या पार्टीत आरोपी प्रियकराने पीडितेला अमली पदार्थ देऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना. 

    accused boyfriend gave drugs to the victim and sexually assaulted

    पालघर : पालघरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 16 वर्षीय मुलीला मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाणं चांगलंच महागात पडलं आहे. पीडित मुलगी आपल्या प्रियकरासोबत कॉमन मैत्रिणीच्या घरी बर्थडे पार्टीला गेली होती. पण या पार्टीत आरोपी प्रियकराने पीडितेला अमली पदार्थ देऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

    या प्रकरणी पीडितेनं शनिवारी पालघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

    याबाबत अधिक माहिती अशी की, , 2 जानेवारी 2025 रोजी आरोपी तरुण पीडित मुलीला एका कॉमन मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन गेला होता. याठिकाणी बर्थडे केक कापल्यानंतर आरोपीनं पीडित मुलीला केक आणि अमली पदार्थ टाकलेलं पेय प्यायला दिलं. हे पेय प्यायल्यानंतर पीडित मुलगी बेशुद्ध झाली. याचा फायदा घेऊन आरोपी पीडितेला घेऊन मैत्रिणीच्या घरात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

    अलीकडेच पीडित मुलगी गर्भवती असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तिने आरोपी प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आहे. पालघर पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचारासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक केली नाही. पण एका १६ वर्षीय मुलीला अशाप्रकारे वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन जात अत्याचार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

    Web Title: accused boyfriend gave drugs to the victim and sexually assaulted

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here