साईंच्या पालखीत घुसली दुचाकी, भीषण अपघात, भक्तावर काळाचा घाला..
Breaking News | Ahmednagar Accident : पालखीत भरधाव दुचाकी घुसल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना.
अहमदनगर: विविध धार्मिक दिंडी, पालखी सोहळ्यात वाहने घुसून अनेकदा अपघात झाले आहेत. या अपघातांची संख्या देखील काही कमी नाही. आता पुन्हा एक अशीच घटना घडली असून श्री रामनवमी उत्सव निमित्ताने निघालेल्या साईंच्या पालखीत दुचाकी घुसल्याने भीषण अपघात झाला आहे.
पालखीत भरधाव दुचाकी घुसल्याने महिलेचा मृत्यू झाला. दोन महिला या अपघातात जखमी झाल्या आहेत. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव चांदेकसारे शिवारात मंगळवारी घडली. ही पालखी नाशिक जिल्ह्यातील होती. या अपघातामध्ये दुचाकीस्वार देखील गंभीर जखमी झाला असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या जखमी दुचाकीस्वारावर उपचार सुरू आहेत. पालखी रस्त्याचे काम अर्धवट राहिले होते त्यामुळेच हा अपघात घडला असे लोक सांगत आहेत. रामनवमीनिमित्त नाशिकमधील पाथरे गावातील ही पालखी दुपारी शिर्डीकडे निघालेली होती.
पालखी चांदेकसारे शिवारात आल्यानंतर भरधाव दुचाकी पालखीत घुसल्याने निता दशरथ दवंगे (रा. पाथरे) या मृत्युमुखी पडल्या. सरला गणपत दवंगे, कांता चिने अशा दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सिन्नर ते सावळीविहीर फाटा यात स्वतंत्र पालखी मार्ग प्रस्तावित असून पालखी मार्गाच्या संपूर्ण अंतरात चौदा ठिकाणी २९२३ मीटर अंतराचं काम निम्यातच सोडून ठेकेदार तेथून काम सोडून गेला आहे. असे साले तरी या मार्गावर ठेकेदाराला टोल वसूलीची परवानगी दिली आहे. त्यामुळे हा जो अपघात झाला आहे याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर निश्चित करुन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशा मागणी सामजिक कार्यकर्ते करत आहेत.
Web Title: Accident where a woman died after a two-wheeler rammed into a palanquin
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study