Accident: कंटेनर दुचाकीवर उलटल्याने अपघात, मायलेक जागीच ठार
श्रीगोंदा | Accident: श्रीगोंदे तालुक्यातील नगर पुणे महामार्गावर गव्हाणेवाडी येथे भरधाव कंटेनर दुचाकीवर उलटल्यांने कंटेनरखाली दबून झालेल्या अपघातात (accident) राळेगणसिद्धी ता. पारनेर माय लेक ठार झाले आहे. हा अपघात रविवारी सकाळी ६:३० वाजता झाला.
पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर दुभाजक तोडून नगर रोडवर पलटी झाला याचवेळी शिरूरवरून दुचाकीवर स्वप्नील बाळू मापारी आणि लक्ष्मीबाई बाळू मापारी वय ६२ हे राळेगणसिद्धीला घरी परतत होते. पण दुभाजक तोडून कंटेनर एम.एच. ४६ ए. एफ. ०२७२ थेट त्यांच्या अंगावर पलटी झाला. यावेळी बंडू मापारी व लक्ष्मीबाई हे दोघे मायलेक कंटेनरखाली दबले गेल्याने दोघेही ठार झाले. या अपघातानंतर वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. त्यानंतर क्रेनच्या सहायाने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Accident when the container overturned on the bike