संगमनेर: ट्रक दुचाकीवर पलटी ; महिलेचा मृत्यू
Breaking News Sangamner Accident: दुचाकीहून प्रवास करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला.
संगमनेर : दुचाकीवर ट्रक उलटून झालेल्या अपघातात दुचाकीहून प्रवास करणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.१९) दुपारी नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर पुणे लेनवर घडला. सरिता उर्फ रंजना गोपीनाथ फटांगरे (रा. पोखरी बाळेश्व) असे मयत महिलेचे नाव आहे.
ट्रक चालक आणि अजूनही एकजण जखमी झाल्याची माहिती असून त्यांची नावे समजू शकली नाहीत. नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर सरिता फटांगरे या त्यांच्या मुलासोबत दुचाकीहून प्रवास करत होत्या. गुंजाळवाडी शिवारात ट्रक फटांगरे यांच्या दुचाकीवर उलटून ट्रकखाली फटांगरे सापडून जखमी झाल्या, त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.
Web Title: Accident Truck overturns on bike woman dies