Home Accident News भरधाव कार घुसली हॉटेलात; ३ ठार

भरधाव कार घुसली हॉटेलात; ३ ठार

Breaking News | Accident: समोर आलेल्या ऑटोला वाचविण्याच्या प्रयत्नात अपघात. तीन ठार.

Accident speeding car entered the hotel; 3 killed

लातूर: हैद्राबादहून लातूरकडे जाणारी भरधाव कार समोरील ऑटो चुकविण्याच्या नादात एका हॉटेलात घुसली. यात कारमधील दोघांचा व हॉटेलसमोर बसलेल्या एका मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी एमआयडीसी पेट्रो पेट्रोलपंपानजीक घडली. यामध्ये चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उमराह येथे गेलेल्या नातेवाइकांना घेऊन कार लातूरकडे येत होती. समोरून आलेला ऑटो चुकविताना चालकाचा अंदाज चुकल्याने हा भीषण अपघात झाला. कारमधील वाजीद चाँदखान पठाण (वय ५७ रा. हत्ते नगर, लातूर), सोहेल गफ्फारसाब शेख (३०, शाहवली रोड, लातूर) व हॉटेलसमोर बसलेला ओमकार पोपट कांबळे (१४, रा. औसा) या तीन जणांचा मृत्यू झाला. शेख आणि पठाण हे मामा भाचे होते.

रस्ता सोडून कार दीडशे फूट बाहेर…

भरधाव कार रस्ता सोडून जवळपास १५० फूट बाहेर असलेल्या सूर्या हॉटेलमध्ये शिरली. यात कारचा चक्काचूर झाली, त्याचबरोबर, हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातग्रस्त कार हॉटेलात शिरली नसती, तर बाजूस असलेल्या आणखी काही लोकांचा जीव गेला असता, असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

Web Title: Accident speeding car entered the hotel; 3 killed

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here