अहमदनगर: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारे पिकअप वाहन विहिरीत कोसळले
Ahmednagar News: भरधाव पिकअप वाहन महामार्गाच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळल्याची घटना. या अपघातात (Accident) सात जण जखमी झाले आहेत.
कोपरगाव: लग्नाचे वराड घेऊन रवंदा कोपरगाव येथून खुलताबादकडे जात असलेली भरधाव पिकअप वाहन महामार्गाच्याकडेला असलेल्या विहिरीत कोसळली. कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे मुंबई – नागपूर महामार्गावरील गुरुवारी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून या घटनेत चालकासह गाडीतील आठ जण जखमी झाले आहे. तळेगावमळे परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावल्याने वेळेवर सगळ्यांना विहिरी बाहेर काढून उपचारार्थ वैजापूर आणि कोपरगावच्या खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आले.
चालकाला वाहनाचा वेग नियंत्रित न करता आल्याने सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने क्रेनच्या सहायाने पिकअप वाहन आणि वाहनातील लोकांना बाहेर काढण्यात आले.
सदर घटनेत अनिल पवार, आकाश पवार , कृष्णा पवार, रवी पवार, विकी पवार, आदी 2 जण हे जखमी झाले असून यांच्यावर उपचार सुरू आहे. सदर विहिरीमध्ये एक जण राहिल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या साह्याने विहिरीतील पाणी उपसा करून बघितल्या असतात त्यात कोणीही मिळून आले नाही.
Web Title: Accident pick-up vehicle carrying the wedding bride fell into a well
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App