एसटीला भीषण अपघात, महिला कंडक्टर आणि प्रवासी ठार
Nashik Accident: सप्तश्रृंगी गडावरून मनमाडकडे निघालेल्या एसटी बसचा मतेवाडी शिवारात झालेल्या भीषण अपघातामध्ये महिला वाहक जागीच ठार झाली तर एक प्रवासी ठार झाला आहे.
नाशिक : सप्तश्रृंगी गडावरून मनमाडकडे निघालेल्या एसटी बसचा मतेवाडी शिवारात अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये महिला वाहक जागीच ठार झाली आहे. तर एका प्रवासी महिलेचाही मृत्यू झाला आहे. अपघात १३ प्रवाशांसह १ चालक जखमी झाला आहे. आज दुपारी दोन वाजता हा अपघात झाला.
वणीच्या सप्तश्रृंगीवरील चैत्र यात्रोत्सवानिमित्त जादा गाड्यांमधून एमएच १४ बीटी ०१०९ या क्रमांकाची बस सोडली होती. एसटीचा रॉड तुटला अन चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाला. या भीषण अपघाताचे फोटो समोर आले आहेत. या अपघातात बसमधील महिला चालक सारिका लहीरे (वाहक) आणि संगीता बाळकृष्ण खैरनार (४५ रा. मनमाड) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. चालक आणि ९ प्रवाशांवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे. या बसमध्ये १३ प्रवाशी होते.
समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटला. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस झाडावर जाऊन आदळून हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Web Title: accident on ST, woman conductor and passenger killed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App