Home Accident News शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

शिवशाही बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दुर्घटनेत तिघांचा मृत्यू

Breaking News | Raigad Accident: रायगड जिल्ह्यात उरण आणि माणगावनजीक झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू.

accident involving Shivshahi bus and rickshaw, three died in the accident

अलिबाग : रायगड जिल्ह्यात उरण आणि माणगावनजीक झालेल्या अपघातांत पाचजणांचा मृत्यू झाला. अपघातात एक लहान मुलगी जखमी झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. माणगावजवळ झालेल्या अपघातात तिघेजण ठार झाले. हे सर्वजण नातेवाईकांच्या दिवस कार्यासाठी रिक्षातून निघाले होते. यावेळी एसटी बस ठाण्यावरून दापोलीकडे जात होती. त्यावेळी रिक्षाचालकाने लेनवरून अचानक वळण घेतल्याने भीषण अपघात झाला. अपघातात रिक्षामधील प्रवीण अनंत मालुसरे, दत्तात्रय नारायण वरंदेकर, गणेश बाबू जाधव (सर्व रा. ठाणे) यांचा मृत्यू झाला. दुसरी घटना उरण रेल्वे स्टेशनजवळ घडली. भरधाव कारने स्कूटीवर जाणाऱ्या एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलीला जोरदार धडक दिली. या धडकेत हे दाम्पत्य ठार झाले. मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

मुंबई -गोवा महामार्गावर माणगाव इथे रिक्षा आणि शिवशाही बसचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ७ एप्रिल रविवारी रोजी ठाणे येथून दापोलीला जाणारी शिवशाही बस माणगावला मानस हॉटेल समोर आली असताना हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण होता, की अपघातग्रस्त रिक्षाचा चुराडा झाला आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांसोबत तात्काळ मदत कार्य सुरू केले. मिळालेल्या माहितीनुसार अपघातामध्ये रिक्षातील तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

या अपघातामध्ये रिक्षात असलेले दत्तात्रय वरणदेकर, प्रवीण मालसुरे आणि आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या व्यक्तीचं नाव अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही.

Web Title: accident involving Shivshahi bus and rickshaw, three died in the accident

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here