कुटुंबाला थारने उडवलं, पप्पासह ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू
Breaking News | Jalgaon Accident: मोटारसायकल आणि थार जीपच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती.
जळगाव: जळगावातील रावेर येथे झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा हृदयद्रावक असा अंत झाला आहे. मोटारसायकल आणि थार जीपच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने रावेरमध्ये प्रत्येकजण हळहळला आहे. कारण, यातील मुलगा हा फक्त तीन वर्षांचा चिमुरडा होता, जो आपल्या वडिलांसोबत गाडीवरुन जात होता.
रावेर तालुक्यातील बोर घाटात सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रितीक बोडोले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.
हा अपघात एवढा भीषण होता की यात पिंटू व त्यांचा चिमुकला मुलगा रितीक यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, त्यांच्या पत्नी आणि ८ महिन्यांचं बाळ जखमी झालं आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकणी अधिक माहिती अशी की, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय २८) आणि दोन मुले रितीक (वय ३) व टेंगुराम (वय ८ महिने) यांच्यासोबत भुसावळहून पालकडे नातेवाइकांच्या भेटीसाठी निघाले होते. दरम्यान, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार गाडीने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली.
Breaking News: Accident Family blown away by Thar, 3-year-old child dies along with father