Home अहमदनगर अहिल्यानगर: उसाच्या ट्रॉलीची धडक; एक ठार

अहिल्यानगर: उसाच्या ट्रॉलीची धडक; एक ठार

Breaking News | Ahilyanagar: उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना.

Accident Cane trolley collision kill one

श्रीरामपूर : उसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना तालुक्यातील हरेगाव-उंदिरगाव रस्त्यावर शनिवारी (दि. १३) घडली. संजय ससाणे (वय ५१) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणारे ट्रक व ट्रॅक्टर हे क्षमतेपेक्षा अधिक ऊस भरून राजरोसपणे वाहतूक करतात. दोन ते तीन ट्रॉली जोडतात. यामुळे वाहतुकीस अडथळाही निर्माण होतो. संजय ससाणे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Accident Cane trolley collision kill one

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here