Accident: प्रवाशांनी भरलेली बस थेट दरीत कोसळली
Accident: एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक प्रवासी जखमी.
शिमला: हिमाचल प्रदेशाची राजधानी शिमला शहराजवळ अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. शिमला येथे प्रवाशांनी भरलेली बस अचानक दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनची बस प्रवाशांना घेऊन नागरोटा (कांगडा) येथून शिमल्याकडे येत होती. बसमध्ये 20 ते 23 जण प्रवासी होते. बस हिरा नगर परिसरात एका घाटात आली असता, चालकाचे बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस थेट 100 फूट खोल दरीत कोसळली.
या दुर्देवी घटनेत बसमधील एका प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर 20 हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
Web Title: Accident bus full of passengers fell directly into the valley