दिंडीत टेम्पो घुसला, दोन वारकरी ठार
Solpaur Accident: विठ्ठलाचे दर्शन घेऊन सायंकाळी गावी परतल्यावर शेळगाव (आर) येथील वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसला. त्यात दोन वारकरी ठार झाले, तर सहाजण जखमी.
वैराग | सोलापूर : पंढरपूर येथे एकादशीनिमित्त बुधवारी विठ्ठलाचे दर्शन घेऊन सायंकाळी गावी परतल्यावर शेळगाव (आर) येथील वारकऱ्यांच्या दिंडीत टेम्पो घुसला. त्यात दोन वारकरी ठार झाले, तर सहाजण जखमी झाले. ही घटना बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे बुधवार संध्याकाळी सव्वाआठच्या सुमारास घडली.
शेळगावमधील वारकरी पंढरपूरवरून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परत टमटमने शेळगाव येथे संध्याकाळी उतरले. दरम्यान, पायी जात असताना सोलापूरवरून वैरागकडे भरधाव वेगाने जाणारा टेम्पो दिंडीमध्ये घुसून हा अपघात झाला. वैराग पोलिसात फिर्याद दिली असून टेम्पोचालक अशोक प्रकाश मेनकुदळे (वय ४५, रा. वैराग) याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जखमी वारकऱ्यांची नावे वासुदेव भाऊ गवळी (५६), तुकाराम शिवराज जाधव (५२) अशी मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांची नावे आहेत, तर शालन भारत अडसूळ, दिनेश दत्तात्रेय लोहार, तुकाराम विष्णू गिलबिले (६३), उषा प्रताप गायकवाड, ज्योतिबा लक्ष्मण शेळके (७०), नीलकंठ अभिमन्यू अडसूळ (५५, सर्व रा. शेळगाव आर, ता. बार्शी) हे जखमी झाले आहेत.
या वर्षीचे अपघात जुलै महिन्यात आषाढीवारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे इथे झालेल्या अपघातात ५ वारकरी ठार तर ८ जण जखमी झाले होते. जुलै महिन्यात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला पुण्यात किरकोळ अपघात झाला. वारकऱ्यांचा टेम्पो उलटून पाच वारकरी जखमी तर २० जण किरकोळ जखमी झाले आहे. कात्रज कोंढवा रस्त्यावर ही घटना घडली होती.
Web Title: Accident A tempo rammed into Dindi, killing two warkaris
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study