क्लासला जाताना १५ वर्षीय विद्यार्थ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार- Accident
Ahmednagar | Rahuri | राहुरी: पहाटेच्या वेळात राहुरी खुर्द येथून राहुरी शहरात सायकलवर क्लासला चाललेल्या १५ वर्षीय शाळकरी मुलगा अज्ञात वाहनाच्या धडकेत (Accident) जागीच ठार झाला आहे. या घटनेत इतर दोन शाळकरी मुली बालंबाल बचावल्या आहेत. राहुरी खुर्द येथील मुळा पाटबंधारे वसाहतीच्या प्रवेशद्वाराजवळ शनिवारी पहाटे हि घटना घडली.
आर्यन अतुल पाटोळे वय १५ हा नेहमीप्रमाणे राहुरी शहरात क्लासला जाण्यासाठी सायकलवर घराबाहेर पडला. आर्यन व क्लासला सोबत जाणाऱ्या दोन मुली पाटबंधारे वसाहतीच्या प्रवेशद्वारा बाहेरील नगर मनमाड राज्य महामार्गावर आल्यावर नगरकडून शिर्डी दिशेला भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने आर्यनला ठोकरल्याने तो जागीच ठार झाला, डोळ्यासमोर आर्यनचा मृत्यू झाल्याचे पाहून बरोबर क्लासला चाललेल्या दोन पैकी अनुषका भांड ही बेशुद्ध झाली. तिला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. शनिवारी दुपारी आर्यनचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
Web Title: Accident 15-year-old student was killed in a head-on collision on his way to class