मोबाईल शॉपी फोडुन चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अवघ्या 5 तासात राजुर पोलिसांनी मुद्देमालासह केले जेरबंद
Akole | Rajur News | राजूर: फिर्यादी तोफिक अयुब तांबोळी, वय 33 वर्षे,रा. ओमनगर,राजुर ता.अकोले जि.अहमदनगर यांचे अपना मोबाईल शॉपी दुकान रात्री कोणीतरी अज्ञात इसमांनी फोडुन दुकानातील एकुण 29000/-रु.किमतीचा मोबाईल, व मोबाईल एक्सेसरीज सामान चोरुन घेवुन गेले. याबाबत फिर्यादी यांनी राजुर पोलीस स्टेशनला येथे दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन गु.र.नं.I 119/2022 भा.द.वी.कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे तसेच पोलीस कर्मचारी हे करीत असताना, तांत्रिक तपासा द्वारे सदरचा गुन्हा हा विजय बाळु शिंदे, रा.चंदनवाडी, राजुर, ता.अकोले याने केले बाबत निष्पन्न झाले. पोलीस स्टाफ यांनी मिळुन आरोपी नामे विजय बाळु शिंदे, वय-33 वर्षे, रा.चंदनवाडी, राजुर, ता.अकोले यास ताब्यात (Arrested) घेवुन सदर गुन्हा बाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. सदर आरोपीकडुन खालील प्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 20,000/- रु. कि.चा विवो कंपणीचा Y33T मोबाईल कि. अ., 9,000/-रु. कि.ची मोबाईल एक्सेसरीज.
तरी आरोपीने वरील चोरी केलेले संपुर्ण साहित्य त्याचे ताब्यातुन जप्त केले आहे. आरोपी यास अटक केली असुन पुढील तपास मपोना. रोहीणी वाडेकर करत आहेत.
सदरची कारवाई मा.मनोज पाटील सो.पोलीस अधिक्षक अहमदनगर, मा.श्रीमती स्वाती भोर मँडम, अप्पर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर व मा.. राहुल मदने सो.उपविभागीय पोलीस अधिकारी,संगमनेर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राजुर पोलीस स्टेशनचे अधिकारी स पो नि.नरेंद्र साबळे व अंमलदार- पो.ना.रोहिणी वाडेकर, पो काँ. अशोक गाढे, पो काँ. विजय फटांगरे,पो काँ. आकाश पवार, पो.ना. पांडुरंग पटेकर यांनी केला आहे.
Web Title: Rajur News Mobile shoplifter arrested in just 5 hours