अहिल्यानगर: तरुणीवर अत्याचार , फोटो व्हायरल करण्याची धमकी!
Ahilyanagar Crime: लग्न करणार असल्याचे आमिष दाखवित एका तरुणीवर वेळावेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर.
अहिल्यानगर : लग्न करणार असल्याचे आमिष दाखवित एका तरुणीवर वेळावेळी अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २०२२ ते नोव्हेबर २०२४ दरम्यान घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात बुधवारी (दि. ४) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण भगवान राजपाल (रा. भिंगार, ता. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.
तरुणीला लग्नाचे आमिष दाखवित आरोपीने गेल्या दोन वर्षांत वेळोवेळी अत्याचार केला. पीडितेने १२ नोव्हेंबर रोजी आरोपीला फोन करून लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने टाळाटाळ केली. तसेच तुला काय करायचे ते कर, मी तुझ्याशी लग्न करणार नाही, असे सांगितले. नंतर तू जर माझ्याशी लग्न केले नाही, तर पोलिसांत तक्रार देईल, असे पीडिता आरोपीला म्हणाली. त्यावर तू जर पोलिसांत तक्रार दिली तर तुझे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करीन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.
Web Title: abused on young woman, threatening to make the photo viral
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study