संगमनेर: कर्जाचे हप्ते फेडण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
Ahmednagar | Sangamner News: कर्जाचे हप्ते फेडतो, लग्न करतो अशी आमिष दाखवून एका ३० वर्षीय महिलेवर अत्याचार (abused).
संगमनेर: कर्जाचे हप्ते फेडतो, तुझ्याबरोबर लग्न करतो, असे अमिष दाखवून तालुक्यातील एका ३० वर्षीय महिलेवर वेगवेगळ्या ठिकाणी नेवून अत्याचार करणार्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मनोली परिसरातील तक्रारदार महिलेला निर्मळ पिंप्री येथील सिद्धार्थ संजय पारखे याने कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी मदत करतो असे गोड गोड बोलून जवळीक साधली. त्यानंतर लग्नाचे खोटे आमिष दाखवून संगमनेर शहरातील गोल्डनसिटी येथील रो हाऊस, निर्मळ पिंप्री येथील राहत्या घरी आणि बाभळेश्वर येथील मैत्रीणींच्या घरी सतत अत्याचार केला.
याकामी सिद्धार्थ पारखे याची नातेवाईक महिलेने मदत करून पीडित महिलेला मारण्याची धमकी दिली. तर आरोपी सिद्धार्थ पारखेच्या मैत्रिणीने देखील पीडितेचा हात धरून आरोपीला पीडितेचे जबरदस्तीने अंगावरील कपडे काढण्यास सांगून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सिद्धार्थ संजय पारख व दोन महिलांविरुध्द भारतीय दंड संहिता कलम 376 (2) (एन), 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक फरजाना पटेल या करत आहे.
Web Title: Abused of a woman by luring her to pay loan installments
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App