Home महाराष्ट्र धक्कादायक! सब-इंस्पेक्टरकडून लग्न झालेल्या कॉन्स्टेबलवर अत्याचार, पतीला सोडण्यासाठी…

धक्कादायक! सब-इंस्पेक्टरकडून लग्न झालेल्या कॉन्स्टेबलवर अत्याचार, पतीला सोडण्यासाठी…

Breaking News | Mumbai Crime: कायद्याचे रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खळबळजनक आरोप, एका फ्लॅटवर नेऊन तब्बल दोन वेळा अत्याचार.

abused of married constable by sub-inspector

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. कायद्याचे रक्षकाची भूमिका बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर खळबळजनक आरोप झाला आहे. हा आरोप त्याच्या विभागातील महिला कॉन्सटेबलने लावला आहे. त्या पोलीस अधिकाऱ्याने महिलेकडून 19 लाख रुपये उकळले आहे. महिला कॉन्सटेबलच्या फिर्यादीनंतर मुंबईतील पंत नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी असणाऱ्या पोलीस विभागातील महिला असुरक्षित असेल तर काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे.

मुंबईतील पंतनगर पोलीस ठाण्यातील हा प्रकार आहे. या पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या एका 32 वर्षीय महिला कॉन्स्टेबलसोबत हा प्रकार घडला आहे. एका सहायक पोलीस निरीक्षकाने त्या विवाहित महिला कर्मचाऱ्याला लग्नाचे आमिष दाखवले. तिला नवी मुंबईतील सानपाडा भागात एका फ्लॅटवर नेऊन तब्बल दोन वेळा अत्याचार केला.

सन 2020 ते जुलै 2022 दरम्यान हा प्रकार आहे. तसेच त्या महिला कर्मचारीकडून 19 लाख रुपये उकळले. त्यानंतर तिला तिच्या पतीला सोडून देण्याचे सांगितले. पतीला सोडून न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. फसवणूक करुन घेतलेल्या पैशापैकी 14 लाख 61 हजार परत केले.

या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधान 376 (बलात्कार), 376 (2) (एन), 354 (ए), 354 (डी), 506 (2) आणि 420 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा पंतनगर पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने दाखल केला. त्यानंतर तो गुन्हा सानपाडा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. याप्रकरणी चौकशी सानपाडा पोलीस करत आहे. यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Web Title: abused of married constable by sub-inspector

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here