Home क्राईम लिव्ह इनमध्ये अत्याचार, मृत आईच्या नावे घेतले कर्ज

लिव्ह इनमध्ये अत्याचार, मृत आईच्या नावे घेतले कर्ज

Nagpur crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखविले, अनेकदा अत्याचार (abused), प्रियकराला अटक.

Abused in live in, loan taken in name of deceased mother

नागपूर : ‘लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीने तिच्या आईच्या नावावर परस्पर कर्ज उचलल्याची बाब समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. प्रफुल्ल रामचंद्र बले (३५, पिरॅमिड सिटी, बेलतरोडी) असे आरोपीचे नाव आहे. २४ वर्षीय तरुणीशी त्याची कोरोनादरम्यान ओळख झाली होती. मुलीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

प्रफुल्लने तिला आधार दिला व मैत्री केली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत लग्नाचे आमिष दाखविले. १४ एप्रिल २०२१ पासून फेब्रुवारी २०२३ या कालावधीत त्याने तिच्यावर अनेकदा अत्याचार केले. या कालावधीत त्याने तिच्या आईचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरून वेगवेगळ्या लोन अॅपवरून दीड लाखांचे कर्ज घेतले. काही महिन्यांनी बँकेतून कर्ज भरण्यासाठी नोटीस आली. त्यामुळे तिला आश्चर्य वाटले. मृत पावलेली आई कर्ज कशी घेऊ शकते, असा सवाल तिने बँक अधिकाऱ्यांना विचारला असता सर्व सत्य उघडकीस आले.

Web Title: Abused in live-in, a loan taken in the name of deceased mother

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here