Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अन मारहाण

अहमदनगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, अन मारहाण

Breaking News | Ahmednagar: प्रेमाच्या जाळ्यात ओढून दहावीत असताना घरी नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलगी अकरावीत गेल्यानंतर पुन्हा पाठलाग करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्याने तिला भर रस्त्यात चापटीने मारहाण: भावाला मारण्याची धमकी.

abused and beating of a minor girl

अहमदनगर : प्रेमाच्या जाळ्यात ओढून दहावीत असताना घरी नेऊन  अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. मुलगी अकरावीत गेल्यानंतर पुन्हा पाठलाग करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मुलीने नकार दिल्याने तिला भर रस्त्यात चापटीने मारहाण केली. अत्याचाराची घटना डिसेंबर २०२३ मध्ये, तर मारहाणीची घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी घडली.

याप्रकरणी गौरव जगधने (पूर्ण नाव माहीत नाही.) याच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ६५ (१) व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण – अधिनियानुसार तोफखाना पोलिस – ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत एका १५ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. पीडिता गेल्या वर्षी दहावीत शिकत होती. तिची सोशल मीडियावरून एकाशी मैत्री झाली. एक दिवस त्याने तिला दुचाकीवरून घरी नेले. त्यावेळी घरी कुणीही नव्हते. त्याने घरी आलीच आहेस तर घर बघून घे, असे म्हणत तिला घरात नेले व अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझ्या भावाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. पीडिता अकरावीत गेली. त्याने पुन्हा मुलीचा पाठलाग सुरू केला. बुधवारी सदर मुलगी कॉलेजमधून घरी जात होती. पाठीमागून तो दुचाकीवरून आला व त्याने मुलीला दुचाकीवर बसण्यास सांगितले. मुलीने नकार दिला. त्याचा त्याला राग आला. त्याने तिला मारहाण केली.

Web Title: abused and beating of a minor girl

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here