लग्नाचे आमिष दाखवत मुलीवर तर गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार
Ahmednagar Crime News: श्रीगोंदा तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अत्याचाराच्या (abused) घटना : पोलिसांनी केले गुन्हे दाखल; तिघांना अटक.
श्रीगोंदा: मुलीवर लग्नाचे आमिष दाखवत तर महिलेवर कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही घटना तालुक्यातील वेगवेगळ्या गावात घडल्या आहेत.
एका गुन्ह्यात मुलीच्या फिर्यादीवरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये व अत्याचार करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तर पीडित महिलेच्या फिर्यादीवरून अत्याचाराचा असे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत.
या प्रकरणी अर्जुन दत्तात्रय दुरगुडे (रा. वायसेवाडी, ता. कर्जत) व महेश निकाळजे (रा. केडगाव, ता. नगर) यांना अटक केली आहे. तालुक्यातील एका गावातील पीडित मुलीला महेश निकाळजे याने १० डिसेंबर व त्यापूर्वी तीन वर्षांच्या कालावधीमध्ये तालुक्यातील कात्रज, पुणे येथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने निकाळजे याला ‘तू माझ्याबरोबर लग्न कर असे म्हटल्यानंतर त्याने मुलीला जातीवाचक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसऱ्या प्रकरणात तालुक्यातीलच एका गावात अर्जुन दत्तात्रय दुरगुडे याने पीडित फिर्यादी महिलेस ६ जानेवारी रोजी कोल्ड्रींक्समधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडित महिलेला पती व मुलांना जीवे मारण्याची धमकी दिली. धमकी देऊन त्याने श्रीगोंदा तालुक्यातील गावासह कल्याण येथेही महिलेवर अत्याचार केला, असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने १४ जानेवारी रोजी खडकपाडा (ठाणे) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घडलेला गुन्हा श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या हद्दीत अगोदर घडला होता, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Web Tile: Abused a girl for marriage and oppressing a woman by giving gungi medicine
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App