पक्षात पद देण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार
Breaking News | Crime: पक्षात पद देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार.
बुलढाणा: पक्षात पद देण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार १७ फेब्रुवारीला शेगाव शहरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेगाव येथील एका पक्षातील आशिष सत्यनारायण व्यास (३७) याची सोशल मीडियावर अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील एका गावातील ३८ वर्षीय विवाहित महिलेसोबत मैत्री झाली. यावेळी आशिष व्यास याने तो राजकीय पक्षात मोठ्या पदावर असल्याचे महिलेला भासविले. तसेच तिला मोठ्या पदावर नियुक्ती देण्याचे आमिष दाखवून मैत्री केली. त्यानंतर आईची प्रकृती बरी नसल्याचे सांगून १ फेब्रुवारी रोजी घरी बोलाविले. सरबतामधून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केला.
Web Title: Abuse of women by luring them to post in the party
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study