Home अहमदनगर अहमदनगर घटना: दोन अल्पवयीनवर अत्याचार

अहमदनगर घटना: दोन अल्पवयीनवर अत्याचार

Breaking News | Ahmednagar: दोन वेगवेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या.

Abuse of two minors

श्रीगोंदा:  गेल्या पाच दिवसात तालुक्यातील पूर्व भागातील एक आणि पश्चिम भागातील एक अश्या दोन वेगवेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहे. यात दोन्ही घटनेत धमकी देऊन संबंधितांवर अत्याचार झाला आहे. यातील एका घटनेत देशाला ‘गजवा ए हिंद’ बनवायचे असल्याचा उल्लेख पीडितेच्या फिर्यादीत आला आहे. काही दिवसांपूर्वी असाच प्रकार बेलवंडी हद्दीत घडला होता. तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील शाळा महाविद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलींना टवाळखोर त्रास देण्याच्या घटना घडत असताना, वेळप्रसंगी मारण्याची धमकी देऊन असाह्यतेचा फायदा घेण्याचे प्रकार वाढले आहेत. दुसरीकडे शिक्षण बंद होईल, यामुळे अनेक मुली घरी काही सांगत नसल्याने याचा गैरफायदा घेऊन जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. तालुक्यातील पूर्व भागातील एका अल्पवयीनला दहावीपासून त्रास देणाऱ्या तरुणाने धमकावत जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला. जून २०२२ ते जानेवारी २०२४ पर्यंत प्रकरणातील तरुणाने अल्पवयीनला नगरला कपडे घेण्यासाठी बळजबरीने नेत असताना मुलीने आरडाओरडा केल्यानंतर काही तरुणांनी मदत केली. नगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये मुलींच्या पालकांना बोलावून घेण्यात आल्यानंतर पीडितेने पालकांना हा प्रकार सांगितल्यानंतर श्रीगोंदे पोलीस स्टेशनमध्ये सलमान रफीक पठाण या तरुणाच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशाच पध्दतीने अत्याचाराला बळी पडावे लागले. कायम मागे फिरून त्रास देत असलेले गावातील साहिल पठाण याने अल्पवयीन मुलीला धमकावत जीवे मारण्याची धमकी दिल्याने पिडीत मुलीला ५ सप्टेंबर रोजी बळजबरीने सोबत श्रीगोंदे शहरातील एका लॉजवर आणून अत्याचार केला. या घटनेत या तरुणाने मला देश ‘गजवा ए हिंद’ बनवायचा आहे असे म्हणत अल्पवयीनवर अत्याचार केले. दोन्ही प्रकरणांत श्रीगोंदे पोलिसांत वेगवेगवेगळ्या दिवशी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्यानुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

Web Title: Abuse of two minors

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here