Home अहमदनगर अहमदनगर: वसतीगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मध्यस्थी मुलगी पसार

अहमदनगर: वसतीगृहातील दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, मध्यस्थी मुलगी पसार

Ahmednagar News | Shrigonda: दोन वेगवेगळे गुन्हे, दोन्ही गुन्ह्यात पिडीत मुलींच्या एकाच मैत्रिणीने मध्यस्थी केली. त्या दोघींच्याही अत्याचार करणाऱ्या तरुणांशी ओळख करून दिली, तिच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे. मात्र ती पसार झाली आहे.

Abuse of two minor girls in hostel

श्रीगोंदा: शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना दोन तरुणांनी चाकूचा धाक दाखवत फोटो प्रसिद्ध करण्याची धमकी देत शहरातील एका लॉजवर नेऊन अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात पीडित मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात जिशान कलीम जकाते, सोहेल रियाज जकाते या दोन जणांसह दोन्ही आरोपींना मदत करणारी दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही गुन्ह्यात पीडित मुलीच्या मैत्रिणीने मध्यस्थी केली आहे. गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी कर्मचाऱ्यांना सूचना करत दोन्ही तरुणांना अटक करत न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने २० डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या दोन्ही घटनेत मध्यस्थी करणारी दौंड तालुक्यातील अल्पवयीन मुलगी पसार झाली आहे.

या बाबत पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार एका गुन्ह्यात पीडित मुलगी शहरातील एका नामांकित विद्यालयाच्या वसतीगृहात शिक्षणासाठी राहत आहे. पीडित मुलगी तिच्या दौंड तालुक्यातील मैत्रिणीसह शहरातील एका हॉटेलवर बसलेल्या असताना, त्या ठिकाणी आलेल्या जिशान कलीम जकाते (रा. जकाते वस्ती श्रीगोंदा) या आरोपीची ओळख पीडित मुलीशी तिचा मानलेला भाऊ अशी करून देत पीडित मुलीच्या मैत्रिणीने खुप वेळा विनंती केल्याने त्यांच्या सोबत काही फोटो काढले. काही दिवसांनी पीडित मुलीला मैत्रिणीच्या मोबाईलवर फोन येऊन तिला भेटायला बोलावले असता, पीडित मुलीने भेटण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपीने तिला एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यास भाग पाडले. दि.२५ सप्टेंबर रोजी शहरातील लॉजिंगवर येथे घेवुन गेला. चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार करून, पीडित मुलीचे अश्लिल फोटो काढले. त्यानंतर वारंवार धमकी देत अत्याचार करत होता.

तर दुसऱ्या घटनेत देखील मध्यस्थी करणाऱ्या दौंड तालुक्यातील मुलीने दुसऱ्या मैत्रिणीची ओळख सोहेल रियाज जकाते, रा. जकाते वस्ती श्रीगोंदा याच्याशी करून दिली. त्या नंतर श्रावण महीन्यातील शेवटच्या सोमवारी पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसह दौंड जवळील भुलेश्वर मंदिर येथे दर्शनासाठी व फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी त्याठिकाणी सोहेल रियाज जकाते हा देखील तेथे आला होता. त्याठिकाणी आरोपीने पीडित मुलीसोबत नको म्हणत असताना देखील फोटो

काढले. काही दिवसानंतर आरोपीने मध्यस्थी करणाऱ्या मैत्रिणीच्या मोबाईलवर फोन करून भेटण्यास बोलाविले. मात्र पीडित मुलीने नकार देताच आरोपीने तिला एकत्रित काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यास भाग पाडले. त्यानुसार दि.२५ सप्टेंबर रोजी शहरातील एका लॉजिंगवर घेवुन जात चाकूचा धाक दाखवत तिच्यावर अत्याचार करून पीडित मुलीचे अश्लिल फोटो काढले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अत्याचार करत होता. वाढत जाणाऱ्या अत्याचारामुळे दोघींनी घडलेला प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला. त्यानंतर दोन्ही पीडित मुलींच्या आईच्या फिर्यादीवरून गुरुवार दि.१४ रोजी रात्री श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Abuse of two minor girls in hostel

(आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here