Home औरंगाबाद पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधम पित्याला दोनदा मरेपर्यंत जन्मठेप

पोटच्या मुलीवर अत्याचार, नराधम पित्याला दोनदा मरेपर्यंत जन्मठेप

Breaking News | Chatarapati Sambhajinagar: पोटच्या सोळा वर्षीय मुलीला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत अत्याचार (abused) करणाऱ्या नराधम पित्याला विविध कलमांखाली दोनदा मरेपर्यंत जन्मठेप आणि एक लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा.

Abuse of Pot's daughter, murderous father sentenced to life imprisonment twice

छत्रपती संभाजीनगर : पोटच्या सोळा वर्षीय मुलीला मारहाण करून ठार मारण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला विविध कलमांखाली दोनदा मरेपर्यंत जन्मठेप आणि एक लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एस. वैरागडे यांनी बुधवारी (ता. २०) ठोठावली. या प्रकरणात पीडितेने फिर्याद दिली होती. त्यानुसार नराधम पिता आणि आई एका वीटभट्टीवर कामाला होते.

८ जून २०२२ रोजी सायंकाळी पीडिता खेळत असताना नराधम पिता दारू पिऊन घरी आला. पीडितेच्या आईने त्याला जेवण दिले. नराधमाने पीडितेला बळजबरी जेवणासाठी बसवले. जेवण झाल्यावर पीडितेला माझ्यासोबत वीटभट्टीवर बिऱ्हाड आणण्यासाठी चल म्हणून सोबत नेले. त्यानंतर आपण दुसऱ्या रस्त्याने घरी जाऊ, असे म्हणत वीटभट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या तळ्याच्या बाजूला नेले.

आज इथेच मुक्काम करू म्हणत पीडितेवर बळजबरी सुरू केली. तिने विरोध करताच त्याने पीडितेला मारहाण केली. ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेच्या आईचे मामा काम करत असलेल्या वीटभट्टीवर नराधमाने पीडितेला सोडले. त्यांनी एवढ्या रात्री का आणले, असा प्रश्‍न केला असता, साहित्य घेण्यासाठी आणले होते, असे सांगत नराधमाने तेथून पळ काढला.

दुसऱ्या दिवशी पीडितेच्या आईने तिच्याकडे चौकशी केली असता, घडलेला प्रकार मुलीने सांगितला. या प्रकरणात खुलताबाद पोलिसात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी तथा तत्कालीन निरीक्षक हातमोडे आणि उपनिरीक्षक मोरे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

खटल्याच्या सुनावणीवेळी सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी दहा जणांच्या साक्षी नोंदविल्या. सुनावणीनंतर न्यायालयाने नराधम पित्याला दोषी ठरवून भादंवि कलम ३७६ (२)(एफ) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजारांचा दंड तसेच कलम ३७६ (२) (एन) अन्वये मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंड, कलम ३२३ अन्वये तीन महिने सश्रम कारावास आणि एक हजारांचा दंड तसेच कलम ५०६ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस नाईक जबीर शेख यांनी काम पाहिले.

Web Title: Abuse of Pot’s daughter, murderous father sentenced to life imprisonment twice

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here