शीतपेयातून गुंगीचं औषध देत तरुणीचं अपहरण; लग्न करत शरीरसुखाची मागणी अन्…
Breaking News | Amravati Crime: शीतपेयामध्ये गुंगीचं औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेतच तरुणीचा विवाह लावण्यात आल्याची खळबळजनक घटना.
अमरावती: महाराष्ट्राला हादरवणारी घटना अमरावतीमध्ये घडली. शीतपेयामध्ये गुंगीचं औषध मिसळून बेशुद्ध अवस्थेतच तरुणीचा विवाह लावण्यात आल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहिती समोर आली. इतक्यावरच न थांबता आरोपीनं तरुणीशी लग्न करत तिच्याकडे शरीसुखाची मागणी करत, तिचे अश्लील फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. 18 डिसेंबर 2023 ते 4 जानेवारी 2024 दरम्यान हे धक्कादायक कृत्य घडल्याची माहिती पोलीस तपासातून उघडकीस आली आहे.
अमरावतीतील चांदूरबाजार पोलीस स्थानकात नुकतीच पीडितेनं सदर प्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी योगेश येवकार (वय 25 वर्षे) आणि शरद कोसरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि फिर्यादी यांच्यात ओळख असून, त्यांच्यात मोबाईलवरून संवादही होत होता. याच ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीनं पीडितेला शिरजगाव बस स्थानकावरून अपहरण केलं.
सावळापूर या गावी नेऊन पीडितेला तिथं शीतपेय देण्यात आलं. यामध्ये आरोपीनं गुंगीचं औषध मिसळलं होतं. बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या या तरुणीचे फोटो काढल्यानंतर आरोपीनं तिला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडे शरीरसुखाची मागणी केली. ही मागणी फेटाळताच आरोपीनं तरुणीला पथ्रोट येथे नेऊन शरद कोसरेच्या मदतीनं तेथील आर्य समाजात तरुणीवर बळजबरी करत तिच्याशी लग्न लावलं.
घडल्या प्रकारानंतर तरुणी घरी परतली आणि जवळपास दोन महिने तिनं हा अत्याचार सहन केला. पण, आरोपीनं सर्व मर्यादा ओलांडल्या आणि अखेर तरुणीनं घडला प्रकार तिच्या वडिलांना सांगितला अन पोलिसांत धाव घेतली.
Web Title: Kidnapping of a young woman by giving gungi medicine
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study