अहमदनगर: मतिमंद महिलेवर अत्याचार; दोघांवर गुन्हा दाखल
Breaking News | Ahmednagar: तीस वर्षीय मतिमंद महिलेवर गवतामध्ये जबरदस्तीने घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना.
श्रीगोंदा : तीस वर्षीय मतिमंद महिलेवर गवतामध्ये जबरदस्तीने घेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः फिर्यादी यांची मतिमंद असेलेली नणंद दि. २७ मे २०२४ रोजी १:०० वाजण्याच्या सुमारास घराजवळील शेजाऱ्याच्या शेतात पपई आणण्यासाठी गेली असता, यातील आरोपींनी मतिमंद महिलेच्या हाताला धरुन शेतातील गिणीगोल गवतामध्ये जबरदस्तीने नेऊन व तिचे तोंड
दाबुन मारहाण करत तिच्यावर अत्याचार केले. याबातची माहिती पीडितेच्या घरच्यांना माहीत होताच एकच खळबळ
उडाली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भा.दं. वि कलम ३७६ (२) (जे) (एल), ३७६ (ड), ३२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई समीर अभंग करत आहेत.
Web Title: Abuse of mentally retarded woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study