Home अहमदनगर संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीची आत्महत्या, पाच जणांवर गुन्हा

संगमनेर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मुलीची आत्महत्या, पाच जणांवर गुन्हा

Breaking News | Sangamner:  एका अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याची घटना उघड झाली, मुलीने बदनामीच्या भीतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ.

Abuse of a minor girl, suicide of a girl, crime against five people

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील साकूर येथे एका पानाच्या दुकानावर एका अल्पवयीन मुलीवर अमानवी अत्याचार केल्याची घटना उघड झाली असून अत्याचार झालेल्या मुलीने बदनामीच्या भीतीने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे . याप्रकरणी घारगाव पोलिसात 5 आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार साकूर येथील रूबाब पान शॉपमधे सदर अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसात आरोपी सौरभ खेमनर, योगेश रामा खेमनर, प्रशांत भास्कर भडांगे, विकास रामदास गुंड, विजय खेमनर या पाच आरोपीवर भादवी कलम 376/3, 306,506 बलात्कार व पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सदर घटना मागच्या दोन-तीन दिवसात घडल्याची माहिती प्राप्त होत असून याबाबतचा अधिक तपास घारगाव पोलिस करत आहे पठारभागात गेल्या काही दिवसांपासून विविध प्रकारची गुंन्हेगारी वाढली आहे.

दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचे रिसीट आणण्यासाठी साकुर गावात आली होती. यावेळी आरोपी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत रुबाब पान शॉप मध्ये नेले. पान शॉप मध्ये तोंडाला रुमाल बांधून तसेच दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला. यासाठी अन्य आरोपीने त्याला मदत केली. अत्याचारावेळी आरोपी योगेश खेमनर याने पान शॉपचे शटर बंद करून घेत बाहेरून कुलूप लावले होते.

तर प्रशांत भडांगे व विजय खेमनर यांनी पान शॉप बाहेर थांबून देखरेख करत सौरभ खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली. यावेळी तेथे आलेल्या बाजीनाथ दातीर याला ‘तू येथे का आला, निघून जा’ अशी विचारणा करत त्याला दमबाजी केली. दरम्यान झालेल्या अत्याचारामुळे इज्जत गेली म्हणून पीडित मुलीने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली होती.

या कारणावरून मुख्य आरोपीसह अन्य आरोपींविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३७६(३), १०९, ३०६, ५०६, ३४ सह बाल लैंगिक अत्याचार संहिता कायदा कलम ८, १२, १७, २१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संतोष खेडकर पुढील तपास करत आहे.

Web Title: Abuse of a minor girl, suicide of a girl, crime against five people

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here