खळबळजनक: फोटो स्टुडिओत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Beed Crime News | बीड: बीडमधील धारूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलगी फोटो काढण्यासाठी आली असता तिच्यावर अत्याचार (Abuse of a minor girl ) केल्याची घटना समोर आली आहे याप्रकरणी पीडितेच्या मुलीच्या फिर्यादीवरून दोन जणांवरगुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी पसार झाले आहेत.
याप्रकरणी मधुर बाळासाहेब फरतडे व सहदेव चाळक या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याविरोधात भारतीय दंड विधान कलम 376, 504 व पॉस्को कायद्यातील कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत मुलीने फिर्यादीत म्हंटले आहे की, सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत पाच ते सहा वेळा फोटो स्टुडिओत अत्याचार घडला असल्याचे म्हटले आहे.
धारूर शहरातील एक अल्पवयीन मुलगी नरसिंह फोटो स्टुडिओ येथे पासपोर्ट फोटो काढण्यासाठी आली. आरोपीने फोटो काढून लगेच न देता दुसऱ्या दिवशी फोटो घेण्यास बोलाविले. दुसऱ्या दिवशी मुलगी आली असता तिला स्टुडिओत बसवून ठेवून यावेळी एक जण बाहेर काम आहे म्हणून गेला. त्यावेळी दुकानात एक मुलगा व मुलगी असे दोघेच होते. यावेळी आरोपीने अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध शारिरीक संबंध प्रस्थापित केले आणि कोणाला काही सांगितले तर तुझ्या भावाला जीवे मारुन टाकीन अशी धमकी दिली असल्याचे पिडीत मुलीने म्हंटले आहे. यावरून दोघांविरुद्ध धारुर पोलीस ठाण्यात पोस्को ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू असून धारूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Web Title: Abuse of a minor girl in a photo studio