Home संगमनेर थोरात गटाला मोठा धक्का! तालुक्यातील एका गावात सरपंच पदासह सदस्य पद रद्द

थोरात गटाला मोठा धक्का! तालुक्यातील एका गावात सरपंच पदासह सदस्य पद रद्द

Breaking News | Sangamner: अनधिकृत बिल काढण्यात आल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी त्यांचे सरपंच पदासह सदस्य पद रद्द केल्याने थोरात गटाला मोठा धक्का बसला.

Abolition of the post of member along with the post of Sarpanch in Shibalapur

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सरपंच प्रमोद सतीश बोंद्रे यांनी ग्रामपंचायतच्या अंतर्गत कोविड काळात आपल्या स्वतःच्या मालकीच्या मेडिकलमधून औषधे वापरून त्यांचे झालेले अनधिकृत बिल काढण्यात आल्याप्रकरणी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमाठ यांनी त्यांचे सरपंच पदासह सदस्य पद रद्द केल्याने थोरात गटाला मोठा धक्का बसला आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

दीपक निवृत्ती रक्टे यांच्या तक्रारीवरून ग्रामपंचायतच्या सन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत प्रमोद सतीश बोंद्रे हे निवडून आले. त्यांनी ग्रामपंचायतकडून आपल्या पदाचा दुरुपयोग करत स्वतःच्या सहीने 30 हजार 384 रुपये स्वतःच्या खात्यात वर्ग केले. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अपात्र करावे, असा अर्ज महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम 14 (1) (ग) व 16 प्रमाणे विवाद जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी दाखल केला होता. त्यानुसार बोंद्रे यांना नोटिसा काढण्यात येऊन त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यास संधी देण्यात आली. संगमनेर पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडून सविस्तर अहवाल घेण्यात आला, त्यानुसार दि. 21 ऑगस्ट, 2024 रोजी दोघांचेही लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आले.

तक्रारदारांनी युक्तीवादात प्रमोद बोंद्रे यांनी कोविडमध्ये 14 व्या वित्त आयोगातून साईराज मेडिकलमधून आरोग्य व शिक्षण लसीकरणकरिता 30 हजार 384 रुपयांचे साहित्य खरेदी केल्याची नोंद आढळल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार प्रमोद बोंद्रे यांनी मेडिकल साहित्य पुरविलेल्या कामाचे 30 हजार 384 रुपये स्वीकारले असल्याचे पुराव्यानुसार दिसून येत असल्याने ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे कलम 14 (1) (ग) व 16 मधील तरतुदींनुसार ग्रामपंचायत सदस्य तथा विद्यमान सरपंच प्रमोद बोंद्रे यांना अपात्र ठरविणे उचित ठरेल, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला. तक्रारदारांच्या बाजूने अ‍ॅड. स्वप्नील काकड यांनी काम पाहिले.

Web Title: Abolition of the post of member along with the post of Sarpanch in Shibalapur

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here