Breaking News | Sangamner: एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावांतर्गत असलेल्या ब्राह्मणदरा येथून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची घटना शनिवार दि. ४ मे रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की ब्राह्मणदरा येथून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी अपहृत मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमावर भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. एकनाथ खाडे हे करत आहे.
Web Title: Abduction of a minor girl
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study