साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत सापडले बेवारस अर्भक
Breaking News Ahmednagar: साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत स्त्री जातीचे बेवारस अर्भक.
शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिर्डीत साई संस्थानच्या रुग्णालयातील कचरा कुंडीत स्त्री जातीचे बेवारस अर्भक प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीमध्ये सापडले आहे.
काल मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. समाजात अद्यापही मुलीस नाकारले जाते आहे हे वास्तव अशा अनेक घटनांतून समोर येते. त्यामुळे पुन्हा एकदा अशा घटना चिंतनाचा विषय ठरला आहे.
आता शिर्डीतील या घटनेने सर्वांचेच डोळे पाणवले आहेत. माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचे समोर आले आहे. काल रात्री अकराच्या सुमारास सफाई कर्मचारी सफाई करत असताना स्त्री जातीच बेवारस अर्भक हे या कचराकुंडीत मिळून आले आहे. त्यानंतर या प्रकरणाचा सगळं उलगडा होत गेला. कॅरीबॅग मध्ये जड वस्तू दिसल्याचे सदर कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्याने त्याने ते उघडून पाहिले. त्यात स्त्री जातीचे नुकत्याच काही तासांपूर्वी जन्मलेल अर्भक मृत अवस्थेत होते असे त्याने म्हटले आहे.
दरम्यान हे अर्भक साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात जन्माला आले नाही असे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे. तसेच आता सीसीटीव्ही तपासणी सुरु केली आहे. नेमके हे अर्भक कुणी आणून येथे टाकले याबाबत आता शोध सुरु आहे. हा शोध घेणे तसेच या बेवारस मृत अर्भकाचे माता-पिता कोण याचाही शोध घेणे आता मोठे आवाहन असणार आहे.
Web Title: Abandoned infant found in garbage pit of Sai Sansthan hospital
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study